सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 18 मार्च 2023 (12:55 IST)

माणूस पूजा करत होता आणि वर बिबट्या उभा, फोटो शेअर करून काय म्हणाले आनंद महिंद्रा

चित्ता धोकादायक प्राणी असून त्याला बघून कोणाचेही भान हरपते. देशाच्या विविध भागांतून बिबट्याच्या हल्ल्याची बातमी तसेच छायाचित्रे आणि व्हिडिओ अनेकदा व्हायरल होत असतात. अशात अलीकडेच उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी जंगलाचा एक फोटो शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
 
यात एका मोठ्या खडकाजवळ मंदिर असल्याचे दिसते. जिथे पांढरा धोतर-कुर्ता घातलेला एक माणूस पूजा करत आहे. तिथे एक बिबट्या त्याच्या अगदी वरच्या खडकावर उभा राहून त्याला पाहत आहे. हे दृश्य पाहून कोणाचाही डोळ्यांवर विश्वास बसत नाही. मिळालेल्या माहितीनुसार हे छायाचित्र राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील जावई हिल्सचे आहे. ते मोठमोठ्या टेकड्या आणि दऱ्यांनी वेढलेले आहे. येथे असलेल्या बेरा गावातील टेकड्या भारतातील पँथर हिल्स किंवा लेपर्ड हिल्स म्हणूनही ओळखल्या जातात. या ठिकाणी रंजक गोष्ट म्हणजे येथे मानव आणि बिबट्या यांच्यात संघर्ष नाही. हे चित्र त्याचा पुरावा आहे.
 
हा फोटो आनंद महिंद्रा यांनी 16 मार्च रोजी ट्विटरवर शेअर केला होता. कॅप्शनमध्ये लिहिले- हे बघून मला जगातील बँकिंग प्रणालीची आठवण का येत आहे? या फोटोला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि हजारो रिट्विट्स मिळाले आहेत. यावर यूजर्स सतत प्रतिक्रिया देत आहेत.