गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सिरसी , मंगळवार, 12 मार्च 2019 (12:23 IST)

राहुल गांधींकडे हिंदू असल्याचा पुरावा आहे का : अनंतकुार हेगडे

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे मागत आहेत. मात्र मला त्यांना प्रश्र्न विचारायचा आहे की मुस्लीम वडील आणि ख्रिश्चन आई असलेल्या राहुल गांधींकडे हिंदू असल्याचा काही पुरावा आहे का? राहुल गांधी स्वतःला कशाच्या जिवावार जानवेधारी हिंदू म्हणवतात? असा प्रश्न केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी विचारला आहे. 
 
पुलवामा हल्लत आपले 40 जवान शहीद झाले. ज्यानंतर भारताने 12 दिवसांनी एअर स्ट्राइक करून पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले. 
 
या हल्लमध्ये दहशतवादी तळ उद्‌ध्वस्त झाले तसे 200 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले असा दावा अतिम शहा आणि इतर भाजप नेत्यांनी केला होता.