गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 19 जानेवारी 2022 (12:03 IST)

मुलायम सिंह यादव यांची सून अपर्णा यांचा भाजपमध्ये प्रवेश

सपा संरक्षक मुलायम सिंह यादव यांची सून अपर्णा यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 
अपर्णा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने अखिलेश यांना मोठा धक्का बसला आहे. दिल्लीतील भाजप मुख्यालयात उत्तर प्रदेश भाजप अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांच्या उपस्थितीत अपर्णा यांनी पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्यही उपस्थित होते. 
 
अपर्णा यादव या सपा प्रमुख अखिलेश यादव यांचे धाकटे भाऊ प्रतीक यादव यांची पत्नी आहे. 2017 मध्ये त्यांनी लखनऊ कँटमधून सपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यांना भाजपच्या रिटा बहुगुणा जोशी यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.