शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 19 जानेवारी 2022 (10:23 IST)

बर्फात व्हॉलीबॉल खेळताना ITBP जवानांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

भारतीय लष्कराच्या जवानांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जवान बर्फात व्हॉलीबॉल खेळताना दिसत आहे. हे जवान बर्फवृष्टीच्या दरम्यान गुडघ्याभर बर्फात खेळत आहे. गारपीटीमध्ये व्हॉलीबॉल खेळणे काही सोपे नाही. जवानांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 
 
व्हिडीओ पाहून लोकांना प्रश्न पडला आहे. की एवढ्या थंडीत जवान देशाच्या रक्षणासाठी किती मेहनत करतात ? युजर्स म्हणतात, आपल्याकडे सर्वात सक्षम आणि बलवान जवान आहेत, जे अत्यन्त कठीण परिस्थितीत देखील देशाचे रक्षण करतात. 

हे जवान 14 हजार फूट उंचीवर व्हॉलीबॉल खेळत आहे. सिक्कीमच्या सीमेवर इंडो -तिबेट बॉर्डरवर पोलिसांचे जवान व्हॉलीबॉल खेळण्याचा आनंद घेत आहेत.