सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 18 जानेवारी 2022 (13:02 IST)

बळी देताना बकऱ्याऐवजी कापला माणसाचा गळा

बकऱ्याचा बळी देण्यासाठी एका व्यक्तीने बकऱ्याऐवजी दुसऱ्या व्यक्तीचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना आंध्र प्रदेशातून समोर आली आहे. आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात रविवारी संक्रांती उत्सवादरम्यान ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक माणूस दारूच्या नशेत होता आणि बकरीला मारण्यासाठी चाकू धरत होता, त्याने जनावर पाळणाऱ्या एकाचा गळा चिरला.
 
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुरेश (३५) याला मदनपल्ले येथील शासकीय रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाला. मदनपल्ले ग्रामीण मंडळाच्या वलसपल्ले येथे परंपरेचा भाग म्हणून लोकांचा समूह जनावरांचा बळी देत ​​असताना हा प्रकार घडला. 
 
गावातील लोक दरवर्षी संक्रांती उत्सवात प्राण्यांचा बळी देतात आणि स्थानिक येल्लम्मा मंदिरात अर्पण करतात. पोलिसांनी आरोपीची ओळख चालापती अशी केली असून तो दारूच्या नशेत होता. अधिक तपास करत असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.