आम आदमी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी अमित पालेकर यांची नियुक्ती
गोवा प्रभारी आतिशी यांची घोषणा
पणजी : आप पक्ष हा फक्त निवडणूक लढविण्यापुरता मर्यादित नसून गोमंतकीयांचा आवाज आहे. आतापर्यंत आपने गोमंतकीयांच्या समस्या, विषय मांडले आहेत. याच पार्श्वभूमीवर आम आदमी पक्ष लोकसभा निवडणूकीत उतरणार असून उत्तर गोवा व दक्षिण गोवा या दोन्ही जिल्हय़ासाठी उमेदवार उभे करणार आहे. याचबरोबर आपल्या प्रवासाच्या नवीन टप्प्यासाठी तयारी करत असताना जुनी कार्यकारिणी बरखास्त करून नवीन कार्यकारिणी स्थापित करण्यात आली असून आम आदमी पक्षाने प्रदेशाध्यक्षपदी अमित पालेकर यांची नियुक्ती केली असून कार्यकारी अध्यक्षपदी बाणावलीचे आमदार कॅप्टन वेन्झी व्हिएगस आणि वेळ्ळीचे आमदार क्रूझ डिसिल्वा यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती आपच्या गोवा प्रभारी तथा दिल्लीच्या आमदार आतिशी यांनी आज पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी अमित पालेकर, प्रतिमा कुतिन्हो, आपचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्र निवडणूक प्रभारी महादेव नाईक, वाल्मिकी नाईक उपस्थित होते.