शनिवार, 2 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल, किरेन रिजिजू यांच्या जागी अर्जुन राम मेघवाल कायदा मंत्री होणार

Modi Cabinet Reshuffle मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात आले आहेत. किरेन रिजिजू यांच्याकडे आता कायदा मंत्रिपदाच्या जागी भूविज्ञान मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर अर्जुन राम मेघवाल यांच्याकडे केंद्रीय कायदा मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार देण्यात आला आहे. यासोबतच ते संसदीय कामकाज आणि सांस्कृतिक मंत्री म्हणूनही काम पाहतील.
 
रिजिजू यांनी 2021 मध्ये मंत्रिपद स्वीकारले
फेरबदलाचा एक भाग म्हणून मेघवाल यांना कायदा आणि न्याय मंत्रालयाव्यतिरिक्त रिजिजू यांचे विद्यमान खातेही मिळेल. पंतप्रधान मोदींच्या सल्ल्यानुसार भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केंद्रीय मंत्रिपरिषदेत दोन मंत्र्यांमधील खात्यांचे पुनर्वाटप करण्याचे निर्देश दिले आहेत.
 
रिजिजू यांनी 8 जुलै 2021 रोजी कायदा आणि न्याय मंत्री म्हणून पदभार स्वीकारला. त्यांनी मे 2019 ते जुलै 2021 या कालावधीत युवक व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणूनही काम केले.
 
मोदी सरकारचे हे नवे मंत्रिमंडळ असेल 
राजनाथ सिंह - संरक्षण मंत्रालय
अमित शहा - गृह मंत्रालय, सहकार मंत्रालय
नितीन गडकरी - रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
किरेन रिजिजू - पृथ्वी विज्ञान मंत्रालय
निर्मला सीतारामन - अर्थ मंत्रालय, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय
नरेंद्र सिंह तोमर - कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय
सुब्रह्मण्यम जयशंकर - परराष्ट्र मंत्रालय
अर्जुन मुंडा - आदिवासी व्यवहार मंत्रालय
स्मृती झुबिन इराणी - महिला आणि बाल विकास मंत्रालय, अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय
पीयूष गोयल - वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, ग्राहक व्यवहार मंत्रालय, अन्न आणि सार्वजनिक वितरण, वस्त्र मंत्रालय
धर्मेंद्र प्रधान - शिक्षण मंत्रालय, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय
प्रल्हाद जोशी - संसदीय कामकाज मंत्रालय, कोळसा मंत्रालय, खाण मंत्रालय
नारायण तातू राणे - सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय
सर्बानंद सोनोवाल - बंदरे, जहाज व जलमार्ग मंत्रालय, आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार मंत्रालय, युनानी, सिद्ध, होमिओपॅथिक (आयुष)
वीरेंद्र कुमार - सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय
गिरिराज सिंह - ग्रामीण विकास मंत्रालय, पंजयती राज मंत्रालय
ज्योतिरादित्य एम. सिंधिया - नागरी विमान वाहतूक मंत्रालय, पोलाद मंत्रालय
अश्विनी वैष्णव - रेल्वे मंत्रालय, दळणवळण मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय