मंगळवार, 2 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : गुरूवार, 1 जुलै 2021 (15:58 IST)

सिक्कीममध्ये 600 फूट खोल दरीत कोसळला लष्कराचा ट्रक, 3 सैनिक शहीद, तीन गंभीर जखमी

Army truck falls into 600 feet deep gorge in Sikkim
पूर्व सिक्कीममध्ये बुधवारी लष्कराच्या जवानांना घेऊन जाणारा ट्रक घाटात पडल्याने तीन सैनिक ठार झाले तर तीन गंभीर जखमी झाले. पोलिसांनी ही माहिती दिली आहे. एका अधिकार्‍याने  सांगितले की, न्यू जवाहरलाल नेहरू रोडवर हा अपघात झाला.
 
ते म्हणाले की हा मार्ग गंगटोकला भारत-चीन सीमेजवळील सोमगो लेक आणि नाथू ला जोडतो. ते म्हणाले की ट्रक कुमाऊं रेजिमेंटचे सहा सैनिक घेऊन गंगटोककडे जात असताना चालकाच्या गाडीवरील ताबा सुटला आणि ते 600 फूट खोल दरीत कोसळले.
 
यात चालक व इतर दोन जवान जागीच ठार झाले. लष्कराच्या, बीआरओ, पोलिस आणि स्थानिक लोकांनी खराब वातावरणामध्ये बचावाची कामे केली आणि जखमी झालेल्या तीन सैनिकांना गंगटोकच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये हलवले. येथून त्यांना पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.