रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : शनिवार, 8 ऑक्टोबर 2022 (13:31 IST)

पीएम मोदी आज इंदूरमध्ये आशियातील सर्वात मोठ्या बायो सीएनजी प्लांटचं उद्घाटन करणार, जाणून घ्या काय आहे खास

Asia's Biggest Bio CNG Plant: संपूर्ण देशात स्वच्छतेत आघाडीवर असलेल्या मध्य प्रदेशातील इंदूर शहराने आता शहरातील कचऱ्याचे ऊर्जेत रूपांतर केले आहे. आशियातील सर्वात मोठा बायो-सीएनजी प्लांट येथे बांधण्यात आला असून जवळपास 400 बस लवकरच बायो-सीएनजीवर धावणार आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्लांटचे उद्घाटन करणार आहेत.
 
प्रकल्प प्रमुख नितेश त्रिपाठी म्हणाले की सेंद्रिय कचरा खोल बंकरमध्ये भरला जातो. नंतर ग्रॅब क्रेनच्या साह्याने उचलून प्रीट्रीटमेंट एरियामध्ये मिलिंग केले जाते. त्याचे स्लरीमध्ये रूपांतरत केलं जातं. डायजेस्टरमध्ये स्लरी डायजेस्ट केलं जातं त्यातून बायोगॅस तयार केली जाते. बायोगॅसला स्टोरेज एरियामध्ये नेलंं जातं ज्यामध्ये 55-60 मिथेन असते, त्यानंतर ते गॅस साफसफाई आणि अपग्रेडेशनसाठी घेतलंं जातं.
 
400 बस आणि 1000 हून अधिक वाहने चालवण्याची योजना
15 एकरांवर पसरलेला हा प्लांट 150 कोटी खर्चून बांधण्यात आला असून या प्रकल्पातून दररोज 400 बसेस आणि 1000 हून अधिक गाड्या चालवण्याचे नियोजन आहे. या प्लांटच्या माध्यमातून पर्यावरणाचा फायदा तर होईलच शिवाय उत्पन्नही मिळेल. हा प्लांट पीपीपी मॉडेलवर बांधण्यात आला आहे ज्याद्वारे इंदूर महानगरपालिकेला वार्षिक अडीच कोटी रुपये मिळतील.
 
इंदूर हे सर्वात स्वच्छ शहर आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे येथील लोक जी 100 टक्के सुका-ओला कचरा घरातूनच वेगळा करुन देतात, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
 
इंदूरचे जिल्हाधिकारी मनीष सिंह म्हणाले की प्लांटच्या विकासामुळे दाट लोकवस्तीच्या शहरांतील हवेची गुणवत्ता शुद्ध होण्यास मदत होईल. एकूण 550 मेट्रिक टन क्षमतेचा हा प्लांट 96 टक्के शुद्ध मिथेन वायूसह CNG तयार करेल.

हा प्लांट पीपीपी मॉडेलवर आणि खाजगी एजन्सीच्या सहकार्याने उभारण्यात आला आहे.