1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 29 मे 2023 (09:44 IST)

Assam Accident: आसाममधील गुवाहाटीजवळ रस्ता अपघात, 7 विद्यार्थी ठार

accident
Assam Road Accident:  आसाममधील गुवाहाटी(Guwahati) येथून एक भीषण रस्ता अपघात झाल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुवाहाटीतील जलकुबारी भागात रविवारी (28 मे) रात्री झालेल्या भीषण रस्ता अपघातात  (Road Accident)सात जणांचा मृत्यू झाला. या रस्ता अपघातात मोठ्या संख्येने लोक जखमीही झाले आहेत, ज्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
रस्ता अपघाताबाबत माहिती देताना गुवाहाटीचे सह पोलीस आयुक्त विजय कुमार म्हणाले की, प्राथमिक तपासाच्या आधारे असे आढळून आले आहे की अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व विद्यार्थी आहेत. जळुकबारी परिसरात हा अपघात झाला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे विद्यार्थी स्कॉर्पिओ कारमधून प्रवास करत होते. स्कॉर्पिओ गाडीच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. त्यानंतर जलुकबारी उड्डाणपुलावर उभ्या असलेल्या बोलेरो डीआय पिकअप व्हॅनला धडक देऊन स्कॉर्पिओ दुभाजकावर जाऊन आदळली.
 
प्राथमिक माहितीनुसार, 10 पैकी 7 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघांची प्रकृती गंभीर असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
 
 
Edited by - Priya Dixit