Assembly Elections 2023 : काँग्रेसने खासदारासह तीन राज्यांसाठी जाहीर केली उमेदवारांची यादी
Assembly Elections 2023 :काँग्रेसने दक्षिणेकडील तेलंगणा राज्यातील 55 उमेदवारांची यादीही जारी केली आहे. कोंडागल मतदारसंघातून पक्षाने प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे. तर गोशामहल मतदारसंघातून मोगली सुनीता, चंद्रयांगुट्टा मतदारसंघातून बोया नागेश, मलाकपेट जागेवरून शेख अकबर आणि नामपल्ली मतदारसंघातून मोहम्मद फिरोज खान यांना तिकीट देण्यात आले आहे.
छत्तीसगडमधील उमेदवारांच्या पहिल्या यादीत मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि उपमुख्यमंत्री टीएस सिंहदेव यांचीही नावे आहेत. भूपेश बघेल पाटणमधून तर सिंगदेव अंबिकापूरमधून निवडणूक लढवणार आहेत. पक्षाकडून कोरबामधून जयसिंग अग्रवाल, कावर्धामधून मोहम्मद अकबर, खैरागडमधून यशोदा वर्मा, कांकेरमधून शंकर ध्रुव, नारायणपूरमधून चंदन कश्यप, दंतेवाडामधून छबिंद्र महेंद्र कर्मा आणि बस्तरमधून लखेश्वर बघेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
भिंड जिल्ह्यातील लाहार विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने पुन्हा डॉ. गोविंद सिंह यांना उमेदवारी दिली आहे. ते सात वेळा येथून आमदार राहिले आहेत. तीन दशकांपासून भाजपला येथे विजय मिळवता आलेला नाही. यावेळी त्यांची लढत भाजपचे अंबरिश शर्मा गुड्डू यांच्याशी आहे. शर्मा आधी बसपामध्ये होते आणि नंतर भाजपमध्ये दाखल झाले.
काँग्रेसने साध्वी राम सिया भारती यांना बडा मल्हारा मतदारसंघातून तिकीट दिले आहे जिथून उमा भारती एकेकाळी आमदार झाल्या होत्या. भाजपने येथून प्रद्युम्न सिंह लोधी यांना उमेदवारी दिली आहे. 2018 मध्ये लोधी यांनी काँग्रेसच्या तिकिटावर येथून निवडणूक जिंकली होती. 2020 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि पोटनिवडणूक जिंकली.
काँग्रेसने नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या तीन राज्यांसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मध्यप्रदेशातील 144 जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून छत्तीसगडमधील 30 जागांसाठी उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. तर तेलंगणामध्ये पक्षाने 55 जागांसाठी नावे जाहीर केली आहेत.
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 144 जागांसाठी उमेदवारच्या नावांची यादी जाहीर केली आहे. छत्तीसगड मध्ये 30 जागांसाठी उमेदवारांचे नाव जाहीर केले आहे. तर तेलंगाना मध्ये काँग्रेस पक्षाने 55 जागेसाठी नाव जाहीर केले आहे.
लाहार मतदारसंघातून पक्षाने ज्येष्ठ नेते गोविंद सिंग यांना उमेदवारी दिली आहे. तर ग्वाल्हेर ग्रामीणमधून साहेबसिंग गुर्जर आणि पूर्व ग्वाल्हेरमधून सतीश सिकरवार यांना तिकीट देण्यात आले आहे. पक्षाने दतियामधून अवधेश नायक, शिवपुरीमधून केपी सिंग, राघोगडमधून जयवर्धन सिंग, सतनामधून सिद्धार्थ कुशवाह, सिवनीमधून आनंद पंजवानी, बेतुलमधून निलय डागा, हरदा आणि भोपाळ सेंट्रलमधून निलय डागा यांना पक्षाने आपले ज्येष्ठ नेते आरिफ मसूद यांना तिकीट दिले आहे. .
Edited by - Priya Dixit