शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

बापाने मुलीची 25 वार करून हत्या केली, CCTV व्हिडीओ व्हायरल

surat crime news
सुरतमध्येही दिल्लीसारखीच घटना घडली आहे. ही घटना 18 मे ची आहे पण हा व्हिडिओ आता समोर आला आहे. येथे एका बापाने आपल्या मुलीची चाकूने भोसकून हत्या केली. त्याने चाकूने 20 वार केले आणि त्याच्या मुलीचा मृत्यू झाला.
 
हे प्रकरण जिल्ह्यातील कडोदरा भागातील आहे. ही घटना रात्री 11 वाजता घडली. किरकोळ कारणावरून कुटुंबात भांडण झाले. रामानुज असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने आधी पत्नीवर चाकूने हल्ला केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. मुलगी चंदकुमारी बचावासाठी आली तेव्हा रामानुजने तिच्यावरही चाकूने 20 ते 23 वेळा हल्ला केला.
 
आरोपीने पत्नीवर हल्ला केला, त्यानंतर त्याचा मुलगा आणि मुलगी पुढे आले. हाणामारी झाली, वडील फार रागात होते. यादरम्यान त्याने स्वत:च्या मुलीची हत्या केली आणि पत्नीलाही जखमी केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
 
हा व्हिडिओ 45 सेकंदांचा आहे. यामध्ये उग्र बाप आपल्या मुलीवर चाकूने वार करत आहे. घटनास्थळी त्याचा एक मुलगा, एक लहान मुलगा आणि मुलगी घाबरून पळून जातात. तो त्याच्या मोठ्या मुलीला मारहाण करत आहे. इतक्यात त्याची बायको येते. हे पाहून आता तिचा नवरा पत्नीच्या मागे धावतो आणि तिच्यावर चाकूने अनेक वार केले. त्यानंतर तो परत येतो आणि मुलीवर पुन्हा वार करतो. 
आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.