1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 3 ऑक्टोबर 2022 (22:53 IST)

अयोध्या: रामलीलामध्ये रावणाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा रंगमंचावर मृत्यू

Ayodhya: Actor who played the role of Ravana in Ramlila dies on stage
अयोध्या जिल्ह्यातील रुदौली ठाण्याच्या क्षेत्रातील ऐहार गावात रामलीलाच्या मंचकादरम्यान रावणाची भूमिका करणाऱ्या 60 वर्षीय कलाकाराचा अचानक मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली. यावेळी उपस्थित प्रेक्षकांसह संपूर्ण गावात शोककळा पसरली. रविवारी रात्री एहार गावात रामलीलाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री एक वाजेच्या सुमारास सीता हरण करण्यात येत होते. दरम्यान, रामलीलेत रावणाची भूमिका करणारा नानकौचा रहिवासी पतिरामला अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि तो मंचावर कोसळला.
 
अभिनय करत असलेले पतिराम रंगमंचावर कोसळतातच रामलीला लगेच थांबवण्यात आली.  ग्रामस्थांनी पतिराम यांना रुग्णालयात नेले.असता डॉक्टरांनी पतीराम यांना मृत घोषित केले. रावणाची भूमिका करणाऱ्याच्या आकस्मिक मृत्यूने कुटुंबात शोककळा पसरली. 
 
 पतीराम अनेक वर्षांपासून रामलीलेत रावणाचे अभिनय करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी देवमती, दोन मुले व दोन मुली असा परिवार असून त्यापैकी एका मुलीचे लग्न झाले आहे. घरातील सदस्यांची अवस्था वाईट आहे.
 
Edited By- Priya Dixit