बुधवार, 14 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : मंगळवार, 4 ऑगस्ट 2020 (18:02 IST)

बाबरी मशीद प्रकरण: माजी खासदार सतीश प्रधान यांना जामीन

babri mashid
बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात आरोपी असलेल्या शिवसेनेच्या माजी खासदाराला सीबीआयच्या विशेष कोर्टानं जामीन मंजूर केला आहे. शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांना 20 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला आहे. बाबरी मशीदप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सीबीआयच्या विशेष कोर्टात सुनावणी सुरू आहे. या सुनावणी दरम्यान सतीश प्रधान गैरहजर होते. त्याआधीच सतीश प्रधान यांनी जामिनासाठी अर्ज केला होता आणि सीबीआयच्या विशेष कोर्टानं त्याला जामीन मंजूर केला.