1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified मंगळवार, 8 डिसेंबर 2020 (08:46 IST)

बच्चू कडू दोन शेतकऱ्यासह निघाले दिल्लीच्या दिशेने

नवी दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू हे दीड ते दोन हजार शेतकऱ्यांसह नवी दिल्लीला निघाले आहेत. यासाठी शेतकऱ्यांसह अमरावतीवरून बच्चू कडू यांनी बाईकवर प्रवास सुरू केला आहे. सोमवारी सकाळी शेतकरी आंदोलनाचा हा ताफा भोपाळहून रवाना झाला आहे. ते मंगळवारी दिल्लीला पोहोचतील.
 
दिल्लीला गेल्यानंतर पुढल्या आंदोलनाची रूपरेषा ठरणार आहे, असे बच्चू कडू यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या मागण्या केंद्र सरकार का पूर्ण करू शकत नाही असा सवाल शेतकर्‍यांनी विचारला आहे. केंद्राच कृषी धोरण शेतकऱ्यांना मारक आहे. यामुळेच आता हे आंदोलन पुकारले असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.