मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 19 सप्टेंबर 2021 (14:05 IST)

बाडमेर: कलियुगी वडिलांनी कीटकनाशक देऊन 4 मुलींची हत्या केली, स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला

बाडमेर: जिल्ह्यातील शिव परिसरात एका कलयुगी वडिलांनी आपल्या चार मुलींना कीटकनाशक प्यायला देऊन त्यांची निर्घृण हत्या केली.नंतर स्वतःने कीटनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.या मध्ये चारही मुलींचा मृत्यू झाला आहे, तर वडिलांना गंभीर अवस्थेत बाडमेर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
 
बाड़मेरचे एएसपी यांनी सांगितले की, शिवच्या पोशाळ गावात, पुरखाराम नावाच्या व्यक्तीने आपल्या चार मुली ज्यांचे वय 9 वर्षे, 7 वर्षे, 5 वर्षे आणि 1.5 वर्षे आहे, त्यांना रात्रीच्या वेळी कीटकनाशके दिली गेली. बेशुद्धीने त्यांना टाकीत घातले आणि नंतर, त्याने स्वतः कीटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, की प्रथमदर्शनी सामोरं आले आहेत की,पुरखा रामला पुन्हा लग्न करायचे होते.कोरोनामुळे बायकोच्या मृत्यूनंतर त्याला त्याच्या मेहुणीशी लग्न करायचे होते.शक्यतो यामुळेच त्याने ही घटना घडवली आहे. पुरखा रामच्या फोनवरून एक सुसाईड नोटही सापडली आहे. त्याचीही तपासणी केली जाईल. चार मृत मुलींचे मृतदेह शिव मोर्चरीमध्ये ठेवण्यात आले आहेत. वडील पुरखाराम यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.