बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

विजय मल्ल्यासारखे स्मार्ट बना, मोदींच्या मंत्र्याचा सल्ला

देशाला 9 हजार कोटींचा चुना लावून विदेशात फरार झालेला विजय मल्ल्या कोणासाठी आदर्श होऊ शकतं हे जाणून हैराण होत असाल तरी असा सल्ला मोदी सरकारच्या एका मंत्र्याने दिला आहे. जुएल ओराम नावाच्या एका मंत्र्याने आदिवासींना विजय मल्ल्यासारखे स्मार्ट बना असा सल्ला दिला आहे. जुएल केंद्रातील आदिवासी विकासमंत्री आहेत.
 
उरांव भागात आदिवासींच्या एका कार्यक्रमाचं बोलताना ओराम म्हणाले की मल्ल्याने वाईट कामे केलेली असली तरी उदयोगात त्याला मिळालेले यश प्रेरणादायक आहे. विजय मल्ल्या एक स्मार्ट माणूस असून त्यासारखे स्मार्ट व्हावे. मल्लयाने बुद्धीमान माणसांच्या सहाय्याने बँका, सरकार आणि राजकारण्यांवर आपला प्रभाव पाडला.’
 
आदिवासी आरक्षणाचा फायदा उचलू शकता आणि संधी मिळवण्यासाठी स्मार्ट व्हावं लागतं. त्यांनी आदिवासी असल्याचं फायदे ही सांगितले.