1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बंगलोर. , शनिवार, 4 सप्टेंबर 2021 (19:08 IST)

कर्नाटक सरकारने लावली ऑनलाईन सट्टेबाजीवर बंदी, कठोर शिक्षा होईल

कर्नाटक मंत्रिमंडळाने शनिवारी ऑनलाइन जुगार किंवा सट्टेबाजीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. तथापि, लॉटरी आणि घोड्यांच्या शर्यतींवर बंदी घालण्यात आलेली नाही. राज्याचे कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री जेसी मधुस्वामी म्हणाले, “आम्ही उच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या आधारे ऑनलाईन जुगार बंद करण्यासाठी कर्नाटक पोलिस कायद्यात सुधारणा करत आहोत. मंत्रिमंडळाने सुधारणांना मंजुरी दिली आहे, ती विधानसभेपुढे ठेवली जाईल.
 
येथे मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांना सांगितले की, सरकारने ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले की मसुद्याच्या विधेयकामध्ये ऑनलाईन गेम्सची व्याख्या आहे, ज्यात सर्व प्रकारची सट्टेबाजी किंवा दाव लावणे सामिल आहे.
 
तथापि, यात लॉटरी आणि सट्टेबाजीचा समावेश नाही किंवा राज्याच्या आत किंवा बाहेर कोणत्याही रेस कोर्सवर आयोजित केलेल्या घोड्यांच्या शर्यतींवर सट्टा लावला जात नाही, असेही ते म्हणाले. 13 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात या संदर्भात सुधारणा विधेयक सादर केले जाईल. विशेष म्हणजे जुलैमध्ये उच्च न्यायालयाने सर्व प्रकारच्या ऑनलाइन सट्टेबाजी आणि जुगारावर बंदी घालण्याच्या याचिकेवर सुनावणी केली होती. या दरम्यान, राज्य सरकारने न्यायालयाला सांगितले की, त्यांनी विधेयकाचा मसुदा तयार केला आहे.