विविध रोगांसाठी 39 प्रकारची औषधे स्वस्त होतील, संपूर्ण लिस्ट वाचा
देशात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून वैद्यकीय उपचार आणि औषधांचा खर्च विशेष चर्चेत आला आहे. एकीकडे रुग्णाची स्थिती आणि दुसरीकडे औषधांचा खर्च अशा दुहेरी चिंतेत रुग्णांचे नातेवाईक असल्याचं चित्र बऱ्याचदा पाहायला मिळत आहे. या स्थितीत सरकारकडून सर्वतोपरी सहाय्य दिलं जात आहे.
याचाच एक भाग म्हणून विविध आजारांवर उपचारांकरिता वापरल्या जाणाऱ्या 39 प्रकारच्या औषधांच्या किमती (Rates) कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना निश्चितच फायदा होईल. कोरोना काळात केंद्र सरकारनं सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिला आहे. विविध आजारांवरील उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या 39 प्रकारच्या औषधांची किमती कमी करण्याचा निर्णय नुकताच केंद्र सरकारनं घेतला आहे.
त्यानुसार ही 39 प्रकारची औषधं स्वस्त होणार आहेत. केंद्र सरकारनं या 39 प्रकारच्या औषधांचा समावेश अत्यावश्यक औषधांच्या राष्ट्रीय यादीत (NLEM) केला आहे. यात कोरोना तसेच कॅन्सर (Cancer), डायबेटिस (Diabetes) आणि टीबीवर (TB) उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा समावेश आहे. यादीत आहे या औषधांचा समावेश ज्या औषधांची किंमत कमी होणार आहे, त्यात कोरोनावर (Corona) उपचारात वापरल्या जाणार आयव्हरमेक्टिनचा (Ivermectin) समावेश आहे. तसेच कॅन्सरवरील उपचारात वापरली जाणारी अॅझासिटीडाइन आणि फ्लूडाराबीन ही औषधं आणि टीबीवरील बिडेक्विअलिन आणि डेलामेनिड या औषधांचाही यात समावेश आहे. डायबेटिस आणि ब्लड प्रेशरवरील उपचारांकरिता वापरल्या जाणाऱ्या औषधांचा यात समावेश करण्यात आलेला नाही. अशी आहे समाविष्ट औषधांची यादी ...
1)Amikacin (antibiotic) 2) Azacitidine (anti-cancer) 3) Bedaquiline (anti-TB) 4) Bendamustine Hydrochloride (anti-cancer) 5) Buprenorphine (opioid antagonists) 6)Buprenorphine+Naloxone (opioid antagonists) 7) Cefuroxime (antibiotic) 8) Dabigatran (anticoagulant) 9) Daclatasvir (antiviral) 10) Darunavir+Ritonavir (antiretroviral) 11) Delamanid (anti-TB) 12) Dolutegravir (antiretroviral) 13) Fludarabine (anti-cancer) 14) Fludrocortisone (corticosteroid) 15) Fulvestrant (anti-cancer) 16) Insulin Glargine (anti-diabetes) 17)Irinotecan HCL Trihydrate (anti-cancer) 18) Itraconazole (antifungal) 19) Ivermectin (anti-parasitic) 20) Lamivudine (antiretroviral) 21)Latanoprost (treat ocular hypertension) 22) Lenalidomide (anti-cancer) 23) Montelukast (anti-allergy) 24) Mupirocin (topical antibiotic) 25) Nicotine replacement therapy 26) Nitazoxanide (antibiotic) 27) Ormeloxifene (oral contraceptive) 28) Phenoxymethyl penicillin (antibiotic) 29) Procaine Benzylpenicillin (antibiotic) 30) Rotavirus vaccine 31) Secnidazole (anti-microbial) 32) Teneligliptin (anti-diabetes) 33) Tenofovir+Lamivudine+Dolutegravir (antiretroviral) 34) Tenofovir+Alafenamide Fumarate (TAF) (antiretroviral) 35) Terbinafine (antifungal) 36)Valganiclovir (antiviral) ही औषधं यादीतून बाहेर या यादीतून 16 औषधांना वगळण्यात आलं असल्यानं त्यांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.