मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 7 मे 2018 (15:25 IST)

हेडफोन लावून गाणी ऐकणं जीवावर बेतल

कानाला हेडफोन लावून गाणी ऐकणं एका महिलेच्या जीवावर बेतल आहे. चेन्नईतील फातिमा (४६) ही महिला कानाला हेडफोन लावून त्या झोपल्या होत्या. त्याचदरम्यान शॉक लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी चेन्नईतील कंथूर येथे ही घटना घडली. फातिमा यांचे पती त्यांना सकाळी उठवत होते. मात्र त्या उठल्या नाहीत त्यामुळे त्यांना संशय आला. शेजाऱ्यांच्या मदतीने फातिमा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. रात्री फातिमा हेडफोन लावून झोपल्या होत्या. त्याचवेळी शॉर्ट सर्किट होऊन त्यांना शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.