शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 7 नोव्हेंबर 2023 (18:35 IST)

Bharat Jodo Yatra: पुन्हा एकदा होणार काँग्रेची 'भारत जोडो यात्रा'!

Bharat Jodo Yatra:काँग्रेसने काही दिवसांपूर्वी भारत जोडो यात्रा काढली होती.काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी 7 सप्टेंबर 2022 रोजी भारत जोडो यात्रा कन्याकुमारी पासून सुरु केली होती. यात्रा 30 जानेवरी 2023 रोजी काश्मीर मध्ये संपली होती. आता काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा भारतजोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याच्या तयारीत आहे. ही भारत जोडो यात्रा हायब्रीडअसण्याची तयारी सुरु आहे.  

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रवास कुठे पायी तर कुठे वाहनातून केला जाणार. ही भारत जोडो यात्रा 2.0 असेल. ही यात्रा या वर्षी डिसेंबर मध्ये सुरु होऊन पुढील वर्षी फेब्रुवारी 2024 पर्यंत सुरु होण्याची शक्यता आहे. 
 
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा पायी केली होती. त्यांनतर त्यांनी आपले अनुभव सांगितले होते. त्यांच्या गुडघ्यात वेदना जाणवत असून त्यांना चालणे कठीण झाले असल्याचे त्यांनी म्हटलं. जनतेने त्यांना या भारतजोडो यात्रेतून भरभरून प्रेम दिले जनतेच्या प्रेमामुळे त्यांची भारतजोडो यात्रा यशस्वीरित्या झाल्याचे ते म्हणाले. आता पुन्हा एकदा भारतजोडो यात्रेला डिसेंबर मध्ये सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदाची ही  भारतजोडो यात्रा हायब्रीड होणार आहे. 
 



Edited by - Priya Dixit