रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 (10:59 IST)

बिग बाझारमधून काढू शकता 2 हजार रुपये

आता बिग बाझारच्या देशभरात 260 स्टोर्स आहे. आता तुम्ही गुरूवारपासून (दि. २४) मॉल आणि अन्य ठिकाणी असणाऱ्या ‘बिग बझार’च्या आस्थापनांमध्ये डेबिट कार्ड स्वाईप करून दोन हजार रुपये काढू शकता. बिग बाझार समूहाचे अध्यक्ष किशोर बियाणी यांनी ट्विटरवरुन ही घोषणा केली आहे. त्यामुळे बँका आणि एटीएम बाहेरील गर्दी कमी होण्याची शक्यता आहे. गुरुवारपासून ‘बिग बाझार’च्या सर्व शाखांमध्ये डेबिट कार्डच्या मदतीने लोकांना दोन हजार रुपये मिळू शकतील. या निर्णयामुळे शहरी भागातील नागरिकांची गैरसोय काहीप्रमाणात कमी होणार आहे. यापूर्वी रिझर्व्ह बँकेकडून दुकाने आणि मॉल्समधील आस्थापनांच्या स्वाईप मशिन्समधून पैसे काढण्याला परवानगी दिली होती. याशिवाय, ग्रामीण भागातही सरकारने पेट्रोल पंपवर देखील दोन हजार रुपये काढण्याची सोय केली होती.