शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 11 सप्टेंबर 2023 (13:57 IST)

Big decision of Delhi government दिल्ली सरकारचा मोठा निर्णय

Big decision of Delhi government : दरवर्षी दिवाळीत दिल्लीतील हवा प्रदूषित होते. या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने गेल्या वर्षी दिवाळीत फटाके जाळणे आणि विक्रीवर बंदी घातली होती. आता केजरीवाल सरकारने यंदाही दिवाळीत फटाके फोडणार नसल्याचे पुन्हा जाहीर केले आहे. दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी हिवाळ्यात वाढणाऱ्या प्रदूषणामुळे असा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.
 
पर्यावरण मंत्री गोपाल राय म्हणाले की, दिल्लीत हिवाळ्यात वाढत्या प्रदूषणाबाबत केलेल्या कामांमध्ये हिवाळ्यात प्रदूषण वाढते हे आपण पाहिले आहे. दिल्लीचा सरासरी AQI जानेवारी ते ऑगस्टपर्यंत खूपच कमी असतो. पण, जसजसा हिवाळा वाढत जातो. हवा प्रदूषित होऊ लागते.