1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 29 ऑगस्ट 2023 (12:19 IST)

राज्य दुष्काळीवर राज्यसरकारच्या निर्णय, दुष्काळ सदृष परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज

eknath shinde devendra fadnavis
सध्या पावसाने राज्यात पाठ फिरवली आहे. त्यामुळे राज्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून विरोधी पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यात दुष्काळ जाहीर केल्याची मागणी केली. या वर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दुष्काळावर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयाच्या वॉर रूम ला दुष्काळ नियंत्रण वॉर रूम तयार केला जाणार आहे.

मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरील सीएम वॉर रूम मधून राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आहे. या रूम मधून दुष्काळाच्या हद्दीतील गाव, तालुका जिल्हे, विभागावर दुष्काळाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवले जाणार आहे. हे ठिकाण या वॉर रूम शी जोडले जाणार आहे. 
 
दुष्काळग्रस्त भागांना दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी विविध उपाय योजना सरकार करणार आहे. यंदा कमी पाऊस झाल्यामुळे राज्यातील काही भाग दुष्काळात जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून राज्य सरकारने परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे पाऊल घेतले आहे. परिस्थितीला बघून त्यावर निर्णय घेतले जाणार. 
 
 
Edited by - Priya Dixit