1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

महाराष्ट्र सरकारचे सार्वजनिक रुग्णालयात मोफत उपचार करण्याचे आदेश जारी

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील महाराष्ट्रातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांना उपचारासह आरोग्य सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती राज्य सरकारने दिली आहे.
 
बुधवारी जारी करण्यात आलेल्या सरकारी ठराव (GR) मध्ये म्हटले आहे की, वैद्यकीय चाचण्या, उपचार आणि सार्वजनिक-खाजगी भागीदारीवर पुरविल्या जाणार्‍या सर्व सेवा, रक्तपुरवठा वगळता, 15 ऑगस्टपासून रुग्णांना मोफत उपलब्ध आहेत.
 
महाराष्ट्रातील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार आणि इतर आरोग्य सेवा देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या 3 ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
 
या योजनेंतर्गत राज्य सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या 2,418 रुग्णालये आणि वैद्यकीय केंद्रांमध्ये मोफत सुविधा उपलब्ध असतील, असे अधिकाऱ्यांनी यापूर्वी सांगितले होते.
 
ते म्हणाले या सुविधांमध्ये 25.5 दशलक्षाहून अधिक लोक उपचार घेतात.