रविवार, 22 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 3 ऑगस्ट 2023 (20:24 IST)

राज्यातील शासकीय रुग्णालयात मिळणार मोफत उपचार, मंत्रिमंडळाचा निर्णय

राज्यातील नागरिकांसाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयात मोफत उपचार मिळणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील गरीब, गरजू रुग्णांना मिळाला मोठा दिलासा मिळणार आहे.  
 
गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयात मोफत उपचार करण्यासंदर्भात निर्णय हा एकमताने घेण्यात आला. यामुळे राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकूण २४१८ संस्था आहेत, या सर्व ठिकाणी निःशुल्क उपचार रुग्णांना मिळणार आहेत. भारतीय राज्यघटनेतील आर्टिकल २१ नुसार Right to Health चा नागरिकांना अधिकार आहे. दरम्यान, या निर्णयामुळे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे.
 
राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, स्त्री रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालय (Super Speciality Hospital - नाशिक आणि अमरावती), कॅन्सर हॉस्पिटल या ठिकाणी मोफत उपचार मिळणार आहेत. सध्या या सर्व रुग्णालयात वर्षभरात उपचार घेण्यासाठी सुमारे २.५५ कोटी नागरिक येतात.