बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 2 नोव्हेंबर 2024 (15:32 IST)

भारतीय लष्कराचे मोठे यश, अनंतनागमध्ये 2 विदेशी दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराने दोन दहशतवाद्यांना ठार केले असून मिळालेल्या माहितीनुसार लष्कराने परिसराला वेढा घातला होता आणि शोध मोहीम राबवली होती.  
 
मिळालेल्या माहितीनुसार जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी झालेल्या चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांना ठार केले.  यापूर्वी दोन दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यावर लष्कराने शनिवारी सकाळी शोधमोहीम सुरू केली होती. या दहशतवाद्यांना दक्षिण काश्मीरमधील अनंतनागच्या कछवानी शांगामध्ये लष्कराने ठार केले. 

तसेच सध्या लष्कराकडून परिसरात शोधमोहीम सुरू आहे.जम्मू-काश्मीर पोलिसांच्या एका अधिकारींनी सांगितले की, चकमकीत सीआरपीएफचे दोन जवान जखमी झालेअसून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

Edited By- Dhanashri Naik