बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 24 ऑक्टोबर 2024 (14:35 IST)

बारामुल्ला न्यायालयाच्या संकुलात ग्रेनेडचा स्फोट झाल्याने पोलीस कर्मचारी जखमी

जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथे ग्रेनेड स्फोट झाला असून मालखाना न्यायालय परिसरात हा स्फोट झाल्याने या घटनेत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रेनेडचा स्फोट चुकून झाला. व परिस्थिती आता नियंत्रणात आहे. तसेच लोकांनी अफवांवर लक्ष देऊ नये असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
 
या घटनेच्या काही वेळापूर्वी त्रालमध्ये दहशतवाद्यांनी उत्तर प्रदेशातील एका मजुरावर गोळ्या झाडल्या.  अधिकाऱ्यांनी सांगितले की, बिजनौरचा रहिवासी असलेल्या शुभम कुमारला बटागुंड गावात दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या. कुमार यांच्या हाताला गोळी लागली. तसेच त्यांनी सांगितले की कुमारला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. गेल्या आठवडाभरात काश्मीरमधील स्थलांतरित मजुरांवर हल्ल्याची ही तिसरी घटना आहे.