गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 14 जून 2023 (17:59 IST)

Bihar : कुटुंबाने मृत मानलेला मुलगा दिल्लीत मोमोज खाताना आढळला

आजपर्यंत तुम्ही अनेक हरवलेल्या बातम्या ऐकल्या आणि वाचल्या असतील. पण यावेळी एक अशी रंजक घटना समोर आली आहे, जी ऐकून तुम्ही थक्क व्हाल. बिहारमधून एक व्यक्ती 5 महिन्यांपासून बेपत्ता झाली होती. कुटुंबीयांनी त्याचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला मात्र तो सापडला नाही. अशा अवस्थेत कुटुंबीयांनी आपला मुलगा मृत झाल्याचे समजले. निशांत कुमार चार महिन्यांपूर्वी सुलतानगंज येथील गंगानिया येथील सासरच्या ठिकाणाहून बेपत्ता झाला होता. याप्रकरणी शालकाने सुलतानगंज पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. दुसरीकडे, निशांतचे वडील सच्चितानंद सिंग यांनी व्याही नवीन सिंह आणि निशांतचा शालक रविशंकर वरअपहरणाचा आरोप केला होता.
 
आता  5 महिन्यांनंतर बिहारमधून बेपत्ता असलेला निशांत नोएडामध्ये मोमोज खाताना सापडला आहे. अर्थात हे ऐकायला थोडं विचित्र वाटतं, पण 5 महिन्यांनी बेपत्ता झाल्यानंतर निशांतला त्याचा मेव्हणाला  नोएडामध्ये सापडला आहे. निशांत सापडताच त्याचा मेहुणा रविशंकर त्याला घेऊन पोलिस ठाण्यात गेला.
 
31 जानेवारी 2023 रोजी निशांत नावाचा तरुण सासरच्या घरातून बेपत्ता झाला होता. त्याचा शालक रविशंकर सिंह यांनीही सुलतानगंज पोलीस ठाण्यात आपला मेहुणा निशांत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र, निशांतचे सासरे नवीन सिंह आणि शालक रविशंकर यांनी त्याचे अपहरण केल्याचा आरोपही निशांतच्या वडिलांनी केला होता.
 
दोन्ही कुटुंबीयांनी निशांतचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र इतके महिने त्याची कोणतीही खबर न मिळाल्याने कुटुंबीयांनी तो मृत झाल्याचा समज केला. याच दरम्यान निशांतचा शालक रविशंकर नोएडाला आला. एके दिवशी तो मोमोज खायला नोएडातील एका दुकानात पोहोचला. जिथे त्याने आपल्या मेव्हण्याला म्हणजेच निशांतला पाहिले, तिथे निशांतची अवस्था अशी होती की त्याच्या शालकाला ही त्याला ओळखता येत नव्हते.
 
खरं तर, रविशंकर ज्या दुकानात मोमोज खायला पोहोचले होते तिथे लोक एका भिकाऱ्याला हाकलून देत होते. त्या भिकाऱ्याची दाढी वाढलेली होती, त्याचे कपडे घाण आणि फाटलेले होते. अशा परिस्थितीत रविशंकर यांनी दुकानदाराला सांगितले की, त्याला मोमोज खायला द्या, मी पैसे देईन. रविशंकर यांनी हे सर्व केवळ माणुसकी म्हणून  केले होते, मात्र त्यानंतर रविशंकर यांनी या भिकाऱ्याला त्याचे नाव आणि पत्ता विचारला.
 
त्या व्यक्तीचे नाव आणि पत्ता ऐकून रविशंकर यांना धक्काच बसला. कारण तो भिकारी दुसरा कोणी नसून त्याचा मेहुणा निशांत होता. जो त्याच्या समोर भिकाऱ्यासारख्या अवस्थेत उभा होता. निशांत बेपत्ता झाल्यानंतर दोन्ही कुटुंबातील संबंध बिघडले. अशा स्थितीत रविशंकर यांनी निशांतला भेटताच प्रथम पोलिसांना बोलावले.
 
पोलिसांनी निशांतला त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले असून, ज्याचा मुलगा मृत झाला आहे, तो सापडल्याने कुटुंबीयांनाही आनंद झाला आहे. घरातील सदस्यांच्या आनंदाला पारावार नाही. निशांतला 13 जून रोजी भागलपूर न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्याचवेळी, आता बिहारच्या सुलतानगंज पोलीस ठाण्याचे पोलीस निशांतला विचारपूस करत आहे. 
 
 








Edited by - Priya Dixit