सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 7 जून 2023 (19:00 IST)

Bihar : पतीचा चेहरा पाहून गर्भवती पत्नीचा मृत्यू

death
भागलपूरमध्ये गर्भवती महिलेचा मृत्यू चर्चेत आहे. त्यांनी प्रेमविवाह केला होता. जमिनीच्या वादात पोलिसांनी पतीला तुरुंगात पाठवले. ती महिला आपल्या पतीला भेटायला गेली आणि त्याचा चेहरा पाहून जगाचा निरोप घेतला. न जन्मलेल्या मुलालाही वाचवता आले नाही. भागलपूरच्या विशेष मध्यवर्ती कारागृहात पतीला भेटत असताना पत्नीने पतीला पाहिले आणि ती बेशुद्ध झाली. तातडीने तिथे असलेल्या पोलिसांनी तिला गाडीतून रुग्णालयात नेले तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पल्लवी यादव असे या मयत महिलेचे नाव आहे. मयत पल्लवी आपल्या कारागृहात असलेल्या पती गुड्डू यादव ह्याला भेटायला आली होती. पतीचा चेहरा पाहून गरोदर पत्नी पल्लवी अचानक खाली कोसळली आणि बेशुद्ध झाली. ती आठ महिन्यांची गरोदर होती. तिला तातडीने रुग्णालयात नेले असता तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तिचे बाळ देखील दगावले. पल्लवी आणि गुड्डू यांचा प्रेम विवाह झाला होता. 

जमिनी वादावरून मारहाणीच्या प्रकरणात गुड्डू यादव ह्याला अटक करण्यात आली. तो गेल्या 8 महिन्यांपासून कारागृहात होता. त्याला भेटायला त्याची पत्नी पल्लवी तिथे आली होती. तिचा मृत्यू झाला. 
या प्रकरणी कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले की, ही  घटना खूप दुःखद आहे. मयत महिला 8 महिन्याची गरोदर होती. अशा परिस्थितीत महिलेला स्वतःचे लक्ष ठेवायला पाहिजे. या प्रकरणात नक्कीच निष्काळजीपणा होता.
 
Edited by - Priya Dixit