शुक्रवार, 2 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 31 डिसेंबर 2016 (17:14 IST)

भिंतीवर चढून पाच खतरनाक कैद्याचे पलायन

bihar jail
बिहारमधील बक्सर सेंट्रल जेलमधून भिंतीवर चढून पाच खतरनाक कैद्यांनी पलायन केले आहे.  पळालेले सर्व कैदी हे जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. शुक्रवारी उशीरा रात्री बक्सर सेंट्रल जेलच्या मेडिकल वॉर्डमधून या 5 कैद्यांनी पलायन केले. स्वतःला आजारी असल्याचे भासवत या पाचही जणांनी जेलमधून पळण्याचा कट रचला.  प्रदीप सिंह, सोनू पाण्डेय, उपेंद्र साह, देवधारी सिंह, सोनू सिंह अशी पलायन केलेल्या कैद्यांची नावे आहेत. कैद्यांनी शोचालयाची खिडकी तोडली आणि ते फरार झाले. दरम्यान, या कैद्यांना पळवण्यात कारागृहातील कर्मचा-यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.