बिकानेर रोड अपघात: क्रूझर ला ट्रकची धडक, 11 जणांचा जागीच मृत्यू
बिकानेर येथे मंगळवारी सकाळी झालेल्या भीषण रस्ते अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला आहे.राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
राजस्थानच्या बिकानेरमधील नोखा या राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी सकाळी एक भीषण रस्ता अपघात झाला. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिकानेर-जोधपूर महामार्गावरील नोखा नागौर दरम्यान असणाऱ्या श्री बालाजी या गावाजवळ क्रूझर कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली.
अपघातानंतर जखमी झालेल्यांपैकी 8 जणांचा जागीच मृत्यू झाला आणि उर्वरित 3 जखमींचा नोखा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.असे सांगितले जात आहे की मृतक मध्य प्रदेशातील सजनखेड़ाव दौलतपूरचे रहिवासी होते.
पंतप्रधान मोदींनी दु: ख व्यक्त केले
या अपघाताबद्दल दुःख व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, राजस्थानच्या नागौरमध्ये झालेला भीषण रस्ता अपघात अत्यंत दुःखद आहे. या अपघातात ज्यांनी आपला जीव गमावला आहे त्यांच्या कुटुंबीयांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. तसेच, जखमींना लवकर बरे वाटावे अशी मी इच्छा बाळगतो.
बिकानेर येथील अपघाताबद्दल दुःख व्यक्त करताना मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी म्हटले आहे की, नागौरच्या श्री बालाजी भागात झालेल्या भीषण रस्ते अपघातात एमपीकडे परतणाऱ्या 11 यात्रेकरूंचा मृत्यू अत्यंत दु: खद आहे. शोकाकुल कुटुंबाप्रती माझी संवेदना आहे, ईश्वर त्यांना या कठीण काळात शक्ती देवो आणि दिवंगत व्यक्तीच्या आत्म्यास शांती लाभो. जखमींच्या जलद चांगल्या आरोग्यं प्राप्ती साठी प्रार्थना.
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नागौर घटनेवर ट्विट करून दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, 'राजस्थानच्या नागौरमधील श्री बालाजीजवळ एका भीषण रस्ते अपघातात उज्जैनच्या 11 भाऊ -बहिणींच्या अकाली निधनाबद्दलची अत्यंत दुःखद बातमी मिळाली. मी देवाला प्रार्थना करतो की दिवंगत आत्म्यांना त्याच्या चरणी स्थान द्या आणि शोकसंतप्त कुटुंबातील सदस्यांना हे अपघात सहन करण्याची शक्ती द्या.ॐ शांति! '