शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 9 सप्टेंबर 2024 (09:26 IST)

पाटण्यात भाजप नेत्याची डोक्यात गोळी झाडून हत्या

Bihar News
बिहारची राजधानी पाटणामध्ये रविवारी पहाटे एका भाजप नेत्याची हत्या करण्यात आली. दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी भाजप नेत्याच्या डोक्यात गोळी झाडली. यामुळे जागीच त्यांचा मृत्यू झाला. पटना येथील चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामदेव महतो कम्युनिटी हॉलजवळ गुन्हेगारांनी ही घटना घडली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. ही घटना घडल्यानंतर आरोपी दुचाकीवरून फरार झाले. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले व या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार या संपूर्ण घटनेची माहिती चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतून देण्यात आली आहे. येथे रामदेव महतो कम्युनिटी हॉलजवळ अज्ञात गुन्हेगारांनी भाजप नेत्याची डोक्यात गोळी झाडून हत्या केली. श्याम सुंदर शर्मा उर्फ ​​मुन्ना शर्मा असे या भाजप नेत्याचे नाव आहे. श्याम सुंदर शर्मा उर्फ ​​मुन्ना शर्मा हे भाजप चौक मंडळाचे माजी अध्यक्ष असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. तसेच पोलीस पुढील तपास करित आहे.