शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 8 सप्टेंबर 2024 (14:46 IST)

नवी दिल्लीहून पाटण्याकडे येणारी मगध एक्स्प्रेसचे दोन भाग झाले

बक्सरमध्ये रेल्वेचा अपघात झाला असून दिल्लीहून पाटण्याकडे येणारी मगध एक्स्प्रेस ट्रेन तुनीगंज रेल्वे स्थानकावर अचानक दोन तुकडे झाली. चालत्या ट्रेनचे दोन तुकडे झाल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली.लोको पायलटने लगेच इमर्जन्सी ब्रेक लावत ट्रेन थांबवली. या घटनेची माहिती मिळतातच रेल्वेचे पथक घटनास्थळी पोहोचले. सुदैवाने या अपघातात कोणतीही हानी झालेली नाही. 

मगध एक्सप्रेस नवी दिल्लीहून पाटण्याकडे जात असताना डुमराव रेल्वे स्थानकातून निघून तुनीगंज रेल्वे स्थानकावर येताच अचानक रेल्वेचे कपलिंग तुटून हा अपघात घडला.

पूर्व मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सरस्वती चंद्र यांनी सांगितले की, रविवारी सकाळी 11.15 च्या सुमारास ट्रेन क्र. 20802 नवी दिल्ली-इस्लामपूर मगध एक्सप्रेसच्या इंजिनच्या 13 आणि 14 क्रमांकाच्या डब्यातील कपलिंग तुटली. ट्रेन सुरक्षितपणे चालवण्यासाठी काम सुरू आहे. या घटनेत कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. 
Edited By - Priya Dixit