गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 15 डिसेंबर 2018 (09:19 IST)

भाजपचा आता परिषदांवर अधिक भर

लोकसभा निवडणुका होण्यापूर्वी भाजपकडून येत्या ११ व १२ जानेवारी रोजी राष्ट्रीय परिषद बोलवली आहे. भाजपचे मुख्य सचिव भूपेंद्र यादव यांच्याकडून ही माहिती देण्यात आली आहे. 
 
भाजपकडून ७ मोर्चे निघणार आहेत. हैदराबादमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाची बैठक पार पडली आहे. १५, १६ डिसेंबर रोजी भाजपच्या युवा मोर्चाची कार्यशाळा होणार आहे. २१, २२ डिसेंबर रोजी भाजप महिला मोर्चाची बैठक होणार असून यामध्ये भाजपच्या राष्ट्रीय पातळीवरील महिला पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. २२ डिसेंबर रोजी महिलांसाठी मोठ्या सभेचे आयोजन केले असून यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलांशी संवाद साधणार आहेत. नागपूरमध्ये अनुसूचित जाती मोर्चाची बैठक १९, २० जानेवारी रोजी होणार असून यामध्य भाजपचे अध्यक्ष अमित शहा मार्गदर्शन करणार आहेत. यानंतर ११, १२ जानेवारी रोजी दिल्‍लीत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय आयोजन केले आहे.
 
दुसरेकडे भुवनेश्वरमध्ये अनुसुचित जाती महिलांसाठी २, ३ फेब्रवारीमध्ये महत्‍वपूर्ण बैठक होणार आहे. पटणातील गांधी मैदानाममध्ये १६ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय सभेचे आयोजन केले असून यावेळी अमित शहा, शिवराज सिंह चौहान, झारखंड चे मुख्यमंत्री रघुवर दास बोलणार आहेत. २१, २२ फेब्रवारी रोजी उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या किसान मोर्चाची बैठक होणार आहे.