शनिवार, 21 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2024 (15:54 IST)

महाराष्ट्र आणि झारखंडमधील आगामी विधानसभा निवडणुकाही भाजप जिंकेल - जेपी नड्डा

jp nadda
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शुक्रवारी सांगितले की, हरियाणापाठोपाठ भाजप पक्ष महाराष्ट्र आणि झारखंडमध्येही आगामी विधानसभा निवडणुका जिंकेल.
 
मिळालेल्या माहितीनुसार नड्डा यांनी प्रसिद्ध श्री नैना देवी मंदिरात दर्शन घेतले आणि प्रार्थना देखील केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजप सरकारच्या कामगिरीवर जनता खूश असल्याचे ते म्हणाले.
 
तसेच हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये पक्षाने चांगली कामगिरी केली असून याचे श्रेय तेथील जनतेला आणि देवाला जाते, असे देखील ते म्हणाले. तसेच महाराष्ट्र आणि झारखंडमधील आगामी विधानसभा निवडणुकाही पक्ष जिंकेल, असेही ते म्हणाले.  विरोधी पक्षाकडे दुर्लक्ष करून सत्ताधारी भाजपने हरियाणात सलग तिसऱ्यांदा यश मिळवले.

Edited By- Dhanashri Naik