संबंधित माहिती
- उद्योगपती रतन टाटा यांचे मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
- महाराष्ट्रात आता रतन टाटांच्या नावावर उद्योगरत्न पुरस्कार, राज्य शासनाचा निर्णय
- रतन टाटा पंचतत्त्वात विलीन, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार
- रतन टाटा यांच्या कुटुंबातील 6 सदस्यांबद्दल माहित आहे का?
- प्रिय मित्र 'गोवा' रतन टाटा यांना निरोप देण्यासाठी आला, पार्थिवापासून दूर जाण्यास तयार नव्हता
महाराष्ट्र उद्योग भवनाला रतन टाटा यांचं नाव देण्याची राज्य सरकारची घोषणा
ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनाने देशात शोककळा पसरली आहे. जगभरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राज्य सरकार ने त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी रतन टाटा यांच्या नावाने महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार देण्याची घोषणा केली असून पुढील वर्षांपासून हा पुरस्कार दिला जाणार आहे.
तसेच मुंबईतील नरिमन पॉईंट येथे मोठं उद्योगभवन उभारण्यात येणार असून या उद्योग भवनाला रतन टाटा यांचे नाव दिले जाणार अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
हा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे. जेणे करून त्यांचे काम व स्मृती लोकांच्या लक्षात कायमस्वरूपी राहील.
रतन टाटा यांना भारतरत्न मिळावे या साठी सर्वत्र मागणी केली जात असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यात रतन टाटांचे नाव भारतरत्न पुरस्कारासाठी प्रस्तावित करण्याचा निर्णय घेतला.
Edited By - Priya Dixit
