बुधवार, 15 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 7 डिसेंबर 2016 (09:53 IST)

अंध व्यक्तीने कश्या ओळखायच्या नवीन नोटा: हाय कोर्ट

नोटबंदीनंतर आलेल्या 500 आणि 2000 हजार रुपयांच्या अनेक प्रश्न निर्माण होत आहे. मात्र नवीन नोटा आणायच्या घाई गडबडीत नव्या नोटांमध्ये काही त्रुटी राहून गेल्या आहेत. तर आपले अंध व्यक्ती या नोटा ओळखू शकत नाहीत, अशी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. या याचिका नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाईंड या संस्थेने दाखल केली आहे. सहा आठवड्यात याबद्दल संबंधितांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आदेश कोर्टाने सरकारला दिले आहेत.
 
नव्या नोटांचा आकार आणि कागद एकाच प्रकारचा आहे. शिवाय ही नोट 500 ची आहे की 2000 रुपयांची हे ओळखण्यासाठी या नोटांवर कोणतीही चिन्हं नाहीत. त्यामुळे पूर्णपणे अंध असलेल्या व्यक्ती तसंच काही प्रमाणात अंध असलेल्या व्यक्तीही या नोटा ओळखू शकत नाहीत. आधीच्या जुन्या नोटांवर काही विशिष्ट चिन्हं होती. त्यामुळे अंध व्यक्तीही या नोटा वापरू शकत होते. त्यामुळे कोणचे आर्थिक नुकसान किवा फसवणूक होऊ नये म्हणून सरकारने लवकर आय्वर उत्तर द्यावे असे कोर्टाने सुनावले आहे.