1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 5 मार्च 2024 (12:23 IST)

2 वर्षांच्या चिमुरडीच्या शरीराचे तुकडे आढळले

झारखंडच्या धनबाद जिल्ह्यातील तोपचांची पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात दोन वर्षाच्या चिमुकलीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तीन तुकडे करण्यात आले.या मुलीचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. 

या चिमुकलीच्या हत्येच्या मागे अंधश्रद्धा आणि जादूटोणा कारण असू शकते. अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.  ही मुलगी गेल्या 14 दिवसांपासून 17 फेब्रुवारी पासून बेपत्ता होती. तिचे कुटुंबीय तिचा शोध घेत होते. शनिवारी एका प्रार्थनास्थळी मृतदेहाचे तुकडे सापडल्याने खळबळ माजली होती. या मृतदेहाची ओळख नातेवाईकांनी पटवली मृतदेह एका लहानग्या चिमुकलीचा होता. 

राजगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत महतोतंड  मधल्या बरदार जोरिया या ठिकाणी एका मुलीचा मृतदेह छिन्न-भिन्न अवस्थेत आढळून आल्याची माहिती एका व्यक्तीं पोलिसांना दिली. या ठिकाणी एका दगडाला शेंदूर लावलेलं, तांदूळ, जानवं, मातीच भांड सापडलं हे भांड फोडलेल होत. मुलीच्या डोक्यावरील केस काढण्यात आले होते.मुलीचा मृतदेह पाहून नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला मुलीचा बाली जादूटोण्यामुळे देण्यात आला असल्याचं लोकांचं म्हणणं आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.    
 
 Edited by - Priya Dixit