गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 28 फेब्रुवारी 2024 (11:13 IST)

महिलेने दिला 3 बाळांना जन्म

baby
एखादी महिला गरोदर असली की  घरचे सर्व जण येणाऱ्या बाळाची वाट बघतात.  प्रत्येक महिलेला आई व्हावं असं वाटते.एखाद मुल  घरात असावं असं प्रत्येकाला वाटते. मात्र झारखंड मध्ये एका महिलेने एकाच वेळी 3 मुलींना  जन्म दिला. हे सर्व बाळ नॉर्मल डिलिव्हरीने झाले आहे.   

सदर घटना झारखंडच्या हजारीबाग येथील आहे. हजारीबागच्या एका रुग्णालयात चतरा जिल्ह्यात मयूरहंडच्या अपरोग  गावातील राहणाऱ्या एका महिलेने तिळ्या बाळांना जन्म दिले.  या मध्ये दोन मुलींचे वजन कमी आहे. त्यांना एका वेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर एका मुलीची तब्बेत चांगली आहे.या तिन्ही मुलींचा जन्म नॉर्मल डिलिव्हरीने झाला आहे.या मुलींचे पालक आनंदित असून ते याला देवाचे आशीर्वाद म्हणत आहे. 
 
 Edited by - Priya Dixit