1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 10 मे 2022 (08:24 IST)

मोहालीतील पंजाब पोलीस मुख्यालयावर बॉम्ब हल्ला

Bomb attack on Punjab Police Headquarters in Mohali
मोहालीमधल्या पंजाब पोलिसांच्या गुप्तचर विभागाच्या मुख्यालयात सोमवारी रात्री स्फोट झाला आहे. अजून तरी या स्फोटाची जबाबदारी कुणीही स्वीकारलेली नाही.
 
पंजाब पोलिसांनी जारी केलेल्या एका पत्रकानुसार सोमवारी रात्री 7 वाजून 45 मिनिटांनी हा स्फोट झाला. हा स्फोट कमी तिव्रतेचा होता. यात कुठलीही हानी झालेली नाही.
 
"हा एक छोटा स्फोट होता. रस्त्यावरून रॉकेटच्या सहाय्याने कुणीतरी हा बॉम्ब फेकला. सध्या पंजाब पोलीस त्याचा तपास करत आहेत. लवकर त्याची माहिती सर्वांसमोर ठेवू," असं वरिष्ठ पोलीस अधिकारी रविंदर पाल सिंग संधू यांनी रात्री उशीरा मीडियाशी बोलताना सांगितलं आहे.
 
या स्फोटात फक्त पोलिसांच्या या इमारतीच्या काचा फुटल्या आहेत. या घटनेनंतर पोलीस मुख्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मोठा फौजफाटा सध्या इथं तैनात करण्यात आला आहे. तसंच नाकाबंदी सुद्धा करण्यात आली आहे.
 
पंजाबचे माजी गृहमंत्री सुखविंदर सिंग रंधावा यांनी ट्वीट करून चिंता व्यक्त केली आहे. तसंच पंजाबमध्ये धार्मिक वातावरण दुषित होत असल्याचं हे लक्षण आहे, असं त्यांनी म्हंटलंय.
 
मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या संपूर्ण घटनेची माहिती मागवली असून ते सतत पोलिसांच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात आलं आहे.
 
ज्या भागात हा स्फोट झाला आहे तिथून काहीच अंतरावर रहिवासी भाग आणि एक गुरुद्वारादेखील आहे.