बुधवार, 18 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 16 ऑक्टोबर 2024 (10:54 IST)

48 तासांत एकापाठोपाठ 10 विमांना बाँम्बची धमकी

aeroplane
नवी दिल्ली : 14 आणि 15 ऑक्टोबर या दोन  दिवसांमध्ये 10 विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहे. तसेच ही धमकी बनावट मेलद्वारे देण्यात आली आहे. यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या. सोमवारी मुंबईहून उड्डाण करणाऱ्या तीन आंतरराष्ट्रीय विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या. यानंतर मंगळवारी नवी दिल्लीहून शिकागोला जाणारे एअर इंडियाचे विमान उडवून देण्याची धमकी देण्यात आली. तसेच इतकेच नाही तर काही वेळापूर्वी जयपूरहून बेंगळुरूला जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसला बॉम्बची धमकी मिळाली होती. यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या.
 
मिळालेल्या माहितीनुसार  'X' खात्यावरून,चार विमानांवर बॉम्बची धमकी देणारी पोस्ट जारी करण्यात आली होती तसेच, सौदी अरेबियाहून लखनौला येणा-या इंडिगो कंपनीच्या विमानाचे मंगळवारी जयपूरमध्ये बॉम्बची धमकी मिळाल्याने इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. तसेच विमानतळाच्या अधिकारींनी सांगितले की, विमान सौदी अरेबियातील दमम विमानतळावरून लखनौला रवाना झाले होते.  विमान 'इमर्जन्सी लँडिंगसाठी जयपूरला पाठवण्यात आले आहे.' हे विमान सध्या एका निर्जन ठिकाणी उभे आहे आणि त्याची सुरक्षा तपासणी केली जात आहे.  
 
239 प्रवाशांना घेऊन मुंबईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला सोमवारी बॉम्बची धमकी मिळाली. यानंतर विमान दिल्ली विमानतळाकडे वळवण्यात आले. एअर इंडियाच्या विमानाव्यतिरिक्त मस्कत आणि जेद्दाहला जाणाऱ्या इंडिगोच्या दोन विमानांनाही बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या. इंडिगो विमानांना टेकऑफपूर्वीच धमक्या मिळाल्या आणि सोमवारी सकाळी संबंधित विमानांना सुरक्षा तपासणीसाठी वेगळ्या ठिकाणी नेण्यात आले होते.
 
तसेच मंगळवारी एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाला बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर त्याचे उत्तर प्रदेशातील अयोध्या विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. तर दिल्लीहून शिकागोला जाणारे एअर इंडियाचे विमान मंगळवारी बॉम्बच्या धमकीनंतर कॅनडाच्या विमानतळाकडे वळवण्यात आले. 15 ऑक्टोबर 2024 रोजी दिल्ली ते शिकागो हे फ्लाइट AI 127 ऑनलाइन पोस्ट केलेल्या सुरक्षेच्या धोक्यानंतर कॅनडातील इक्लुइट विमानतळावर उतरले आहे. 

Edited By- Dhanashri Naik