दिल्लीती 6 शाळांना पुन्हा बॉम्बची धमकी, तपास सुरू
New Delhi News: राजधानी दिल्लीतील सहा शाळांना शुक्रवारी सकाळी बॉम्बची धमकी देणारा मेल मिळाला, त्यानंतर विविध यंत्रणांनी शाळेच्या परिसराची झडती सुरू केली आहे. तसेच यापूर्वी 9 डिसेंबर रोजी दिल्लीतील किमान 44 शाळांना अशाच प्रकारचे ईमेल प्राप्त झाले होते. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्या धमक्या अफवा असल्याचे म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या संदर्भात दिल्ली अग्निशमन सेवेच्या अधिकारीने आज सांगितले की, आम्हाला ६ वाजता (धमकीच्या ई-मेल संदर्भात) कॉल आला. ते म्हणाले की, अग्निशमन विभाग, पोलिस आणि बॉम्ब निकामी पथकांसह श्वानपथक शाळांमध्ये पोहोचले असून तपास करत आहे. शाळा प्रशासनाने पालकांना संदेश पाठवून मुलांना शाळेत न पाठवण्याची विनंती केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.