मंगळवार, 4 मार्च 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 4 मार्च 2025 (15:04 IST)

तरुणाने आई-वडील आणि बहिणीची केली निर्घृण हत्या

murder
Odisha News : ओडिशातील जगतसिंहपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका २१ वर्षीय तरुणाने रागाच्या भरात आपल्या आईवडिलांची आणि बहिणीची निर्घृण हत्या केली. ही घटना जयबाडा परिसरात पहाटे अडीच वाजता घडली, त्यामुळे संपूर्ण परिसरात घबराट पसरली.  
मिळालेल्या माहितीनुसार घटनेनंतर आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होता पण पोलिसांनी त्याला परिसरातील हायस्कूलजवळ अटक केली.आरोपीचे त्याच्या कुटुंबाशी कशावरून तरी भांडण झाले होते. रागाच्या भरात त्याने त्याच्या आईवडिलांवर आणि बहिणीवर दगडाने हल्ला केला आणि तिघांचाही जागीच मृत्यू झाला. सकाळी शेजाऱ्यांनी घरात रक्ताने माखलेले मृतदेह पाहिले तेव्हा त्यांनी ताबडतोब पोलिसांना कळवले. घटनेची माहिती मिळताच, जगतसिंगपूरचे एसपी आणि वैज्ञानिक तपास पथक घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला.
Edited By- Dhanashri Naik