शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

सेल्फी डिलीट करायला नकार दिला, प्रेयसीने करवले प्रियकराचे अपहरण

तामिळनाडू येथे एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. प्रियकराने सोबत घेतलेली सेल्फी डिलीट करायला नकार दिल्यामुळे प्रेयसीने त्याचे अपहरण केले. 
 
चेन्नई येथील 20 वर्षीय मुलीने आपल्या प्रियकराला तिच्यासोबत घेतलेली सेल्फी डिलीट करायला सांगितले. त्याने नकार दिला. यावरून दोघांमध्ये वाद घडला. रागात मुलाने प्रेयसीच्या डोक्यावर हेल्मेटने हल्ला केला. नंतर प्रेयसीने प्रियकराचे अपहरण करवले.
 
पीडित मुलाचं नवीन अहमद असे नाव आहे. तो घरी येत असताना त्यांना चार लोकांनी धरले. त्याला जबरदस्तीने निर्जन जागेवर घेऊन गेले आणि त्याकडून मोबाइल, आयपॅड हिसकावून घेतले.  त्याच्याशी मारहाण केल्याने तो बेशुद्ध पडला. दुसर्‍या दिवशी शुद्धीत आल्यावर त्याने लोकांची मदत घेऊन पोलिसांना सूचित केले.