1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 22 जुलै 2021 (16:42 IST)

5 पैशांचे नाणे आणा आणि पोटभर बिर्याणी खा, भन्नाट ऑफर पडली महागात

Bring a coin of 5 paise and eat a full biryani
एका हॉटेल हॉटेल मालकाला सुचलेली एक भन्नाट आयडिया महागात पडली. 5 पैशांचे नाणे घेऊन येईल त्याला बिर्याणी दिली जाईल. पण त्याची ही आयडीया त्याच्या चांगलीच अंगलट आली.
 
तामिळनाडुतल्या चेन्नईमध्ये एका व्यक्तीने सुकन्या बिर्याणी हॉटेलची सुरुवात केली. मग आपल्या हॉटेलच्या जाहीरातीसाठी हॉटेल मालकाने एक भन्नाट ऑफर दिली. जो 5 पैशांचे नाणे घेऊन येईल त्याला बिर्याणी दिली जाईल. पण त्याची ही आयडीया त्याच्या चांगलीच अंगलट आली. हॉटेल मालकाला कदाचित याची कल्पना आली नाही की त्याच्या या ऑफरमुळे काय गोंधळ उडणार आहे.
 
बिर्याणीचे हॉटेल चेन्नईच्या सेल्लू भागात असून पाच पैशांत बिर्याणी मिळणार अशी बातमी पसरल्यावर लोकांनी आजूबाचूला मागून नाणी एकत्र केल्या आणि या मुळे एवढी गर्दी गोळा झाली की रांग काही कमी होयच नाव घेईना. हॉटेलबाहेर 5 पैशात बिर्याणी खाण्यासाठी भलीमोठी रांग लागली. हातात 5 पैशाचं नाणे घेऊन अनेक जण हॉटेलमध्ये आले. एक वेळ तर अशी आली की हॉटेलबाहेर 300 लोकं रांगेत उभे होते. गर्दीमुळे एकच गोंधळ उडाला आणि अखेर गोंधळामुळे हॉटेलमालकाला शटर खाली करावं लागलं.
 
5 पैशात बिर्याणी खाण्याच्या नादात लोकं कोरोना अजून आहे हेच विसरले. लोकांना मास्कचाही विसर पडला, सोशल डिस्टिन्सिंगचा तर फज्जाच उडाला. फक्त हातात 5 पैशांचं नाणं घेऊन लोक उभे होते. गर्दी आवाक्याबाहेर गेल्यावर अखेर पोलिसांना बोलावण्यात आलं. पोलिसांनी लोकांना कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं. काहीनी 5 पैशांचे नाणे देऊनही बिर्याणी न मिळाल्याची तक्रार बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांकडे केली.