गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 11 मार्च 2023 (12:29 IST)

jaipur जोडप्याचा बुलेटवर रोमान्स

romance in bike
social media
जयपूर : होळीच्या दिवशी एका प्रेमी युगुलाने सर्व मर्यादा ओलांडल्या. त्यांच्या या कृत्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाल . या व्हायरल व्हिडीओमध्ये मुलगा बुलेट बाईक चालवत आहे आणि मुलगी बाईकच्या पेट्रोल टाकीवर बसलेली दिसत आहे. मुलीचा चेहरा मुलाच्या चेहऱ्याच्या अगदी विरुद्ध आहे. मुलीने मुलाला आपल्या हातात धरले आहे. घटनास्थळी उपस्थित लोकांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर टाकला. त्यानंतर आता जयपूर वाहतूक पोलिसांनी याप्रकरणी कारवाई केली आहे.
 
जयपूरच्या वाहतूक पोलिसांनी निष्काळजी मुलाची ओळख पटवली असून त्याची बुलेट बाईक ताब्यात घेतली आहे. यासोबतच वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाच हजार रुपयांचे चलनही करण्यात आले आहे. हा व्हिडीओ जवाहर सर्कल पोलीस स्टेशन हद्दीतील बिटू बायपास जवळील जयपूरमधील सर्वात पॉश भागातील आहे.
 
अशाप्रकारे व्हायरल व्हिडिओवरून पोलिसांना दुचाकीस्वाराची माहिती मिळाली
पोलिसांनी व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या दुचाकी क्रमांकाची माहिती काढली. त्यामुळे ही दुचाकी सांगानेर येथील रामचंद्रपुरा येथील रहिवासी हनुमान सहाय यांच्या नावावर असल्याची माहिती मिळाली. यानंतर ट्रॅफिक एसआय गिरीराज प्रसाद आणि कॉन्स्टेबल बाबूलाल दोघेही हनुमान सहाय यांच्या घरी पोहोचले. जिथे बुलेट बाईक उभी होती. या संदर्भात वाहतूक पोलिसांनी या तरुणाला विचारपूस केली असता, त्याने होळीच्या दिवशी दारू प्यायली होती, हे सर्व कसे घडले, हे कळत नसल्याचे पोलिसांना सांगितले.
 
यानंतर पोलिसांनी दुचाकीवरून तरुणाला घेऊन पोलीस ठाणे गाठले. तेथे पोलिसांनी 5 हजार रुपयांच्या चलनासह बुलेट जप्त केली. दारूच्या नशेत आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये हेल्मेटशिवाय बेपर्वा स्टंट केल्याबद्दल वाहतूक पोलिसांनी त्याच्यावर कलम 194D, 184, 181 आणि कलम 207 नुसार कारवाई केली आहे. आता 15 दिवसांनी चलन न्यायालयात सादर केले जाणार आहे.