शुक्रवार, 6 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 7 ऑक्टोबर 2024 (13:34 IST)

मंदिरातून यात्रेकरूंना घेऊन येणारे बस पलटली, 4 ठार

गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यात सोमवारी सकाळी एक भीषण अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. अंबाजी मंदिरातून यात्रेकरूंना घेऊन परतणारी बस उलटून चार जण ठार तर 30 जण जखमी झाले आहे. पोलिसांनी या घटनेची माहिती दिली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार ही बस सुमारे 50 यात्रेकरूंना घेऊन खेडा जिल्ह्यातील कठालाल येथे जात होती. तसेच नवरात्री असल्याने अंबाजी मंदिरात पूजा करून भाविक परतत होते. दांता पोलीस स्टेशनच्या अधिकारींनी सांगितले की, बस डोंगरी रस्त्यावर असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले, त्यामुळे बस त्रिशूलिया घाटात पालटली.
 
तसेच या अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिस अधिकारींनी दिली आहे. नऊ प्रवाशांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून इतर 25 जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Edited By- Dhanashri Naik