शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 16 सप्टेंबर 2024 (09:54 IST)

आयसीयूमध्ये जाण्यापूर्वी शूज काढायला सांगितल्याने डॉक्टरला मारहाण

pitai
गुजरातमधील भावनगरमधील एका खासगी रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण केली आहे. डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईकांना शूज काढण्यास सांगितले होते.
 
मिळालेल्या महतीनुसार गुजरातमधील भावनगरमध्ये एका डॉक्टरला झालेल्या मारहाणीनंतर प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. एका खाजगी रुग्णालयात, आयसीयूमध्ये जाण्यापूर्वी, डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईकांना शूज काढण्यास सांगितले होते. याचा राग आल्याने रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांनाच मारहाण केली. तिघांनी डॉक्टरांवर लाथ मारून आणि बूटांचा वर्षाव करून गंभीर जखमी केले होते. तसेच पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिन्ही आरोपींना अटक केली आहे. सध्या देशभरातील डॉक्टर त्यांच्या सुरक्षेसाठी आंदोलन करत असून अशावेळी एका खासगी रुग्णालयातून मारहाणीची ही घटना समोर आली आहे.
 
पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली-
गुजरातमधील भावनगरमध्ये ही घटना घडली आहे. डोक्याला दुखापत झालेल्या महिलेला रुग्णालयामध्ये मध्ये दाखल करण्यासाठी तीन जण घेऊन आले होते. डॉक्टरांनी तिघांनाही आयसीयूमध्ये जाण्यापूर्वी बूट काढण्यास सांगितले होते. याचा राग येऊन तिघांनीही डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर डॉक्टरला मारहाण केली. यानंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली.