संबंधित माहिती
- Online Wedding: वधू-वर दूर, मध्येच पूर, हिमाचल प्रदेशात जोडप्यानं केलं ऑनलाईन लग्न
- Himachal Pradesh :हिमाचलमध्ये पावसाचे तांडव; 24 तासांत 8 जणांचा मृत्यू, रस्ते पूल वाहून गेले
- हिमाचल प्रदेशात पावसाने हाहाकार; रस्ते, पूल वाहून गेले
- Himachal Tourism: हिमाचलच्या सुंदर ठिकाणाला नक्की भेट द्या
- Best Destinations: एप्रिल महिन्यात फिरण्याचे ठिकाण
Shimla News शिमल्यात कार दरीत कोसळली, 3 जणांचा मृत्यू
Car falls into valley in Shimlaहिमाचल प्रदेशमध्ये शुक्रवारी शिमला जिल्ह्यातील रोहरू भागात वाहन दरीत कोसळून तीन जण ठार तर दोन जण जखमी झाले. पोलिसांनी ही माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिरगावच्या खबिल गावाजवळ हा अपघात झाला ज्यात पृथ्वी राज, सत्य प्रकाश आणि चालक अनिल, खबिल पंचायतीचे माजी प्रमुख यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी सांगितले की, जखमी त्रिलोक आणि अवंतिका यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यापैकी एकाला नंतर शिमला आयजीएमसीमध्ये चांगल्या उपचारांसाठी पाठवण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस या प्रकरणाचा सविस्तर तपास करत आहेत. (भाषा)